
शाहू कारखाना कार्यस्थळावर साधला शेतकऱ्यांशी संवाद

कागल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती देत आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच केंद्र सरकारचा ध्यास आहे असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आहे.
कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर केंद्राच्या विविध योजनांच्या लाभार्थी शेतकऱ्यांशी लोकसभा प्रवास उपक्रमांतर्गत संवाद साधताना ते बोलत होते.मंत्री सिंधिया पुढे म्हणाले, केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिलासा देणारे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, विमा संरक्षण, नुकसान भरपाई, प्रोत्साहन अनुदान, आधुनिक तंत्रज्ञान असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी जलजीवन मिशन व सर्व नागरिकांना घरे योजनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबवली आहे. त्याचा कागलमध्येही मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. विरोधक मोदींच्या या योजनांचे श्रेय घेऊन सत्कार करून घेत आहेत. त्यामुळे त्यांची कीव करावीशी वाटते.यावेळी खासदार धनंजय महाडिक,माजी केंद्रीय मंत्री बाळा भेगडे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, बाबासाहेब पाटील राहुल देसाई, उत्तमदादा कांबळे ,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी. पाटील, राहुल आवाडे आदी उपस्थित होते.
स्वागत संचालक डॉ डी एस पाटील यांनी केले. आभार प्रताप पाटील यांनी मानले.
चौकट एक*
जनसेवा हाच घाटगे घराण्याचा धर्म* यावेळी सिंधिया यांनी ग्वाल्हेरचे सिंधिया व कागलच्या घाटगे घराण्याचे ऋणानुबंध असल्याचे सांगत त्यांना उजाळा दिला. स्व माधवराव सिंधिया व स्व राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला .या घराण्याने जनसेवा हाच धर्म मानून पिढ्यानपिढ्या काम केले आहे. हाच वारसा राजे समरजितसिंह घाटगे समर्थपणे चालवीत आहेत. असे गौरवोद्गार काढले.
चौकट दोन*
बारा बलुतेदारांसमवेत राजे बसले पंक्तीत*सिंधिया व घाटगे घराण्यास लोकसेवेचा फार मोठा वारसा आहे. बारा बलुतेदार व अठरापगड जाती जमातीतील गोरगरीब जनतेच्या उद्धारासाठी पिढ्यानपिढ्या अव्यातपणे या दोन्ही घराण्यांचे काम सुरू आहे.त्यांच्यामध्ये मिसळताना राजेशाहीचा डामडौल विसरून सहजपणे त्यांचे वारस एकरूप होतात. या दौऱ्या दरम्यान भोजन व्यवस्थेवेळी कागल तालुक्यातील बारा बलुतेदार व अठरापगड जातीतील नागरिकांसमवेत भारतीय बैठक पद्धतीने मांडी घालून मंत्री सिंधिया व श्री घाटगे यांनी सपत्नीक भोजन केले. दस्तूर खुद्द दोन राजे मांडी घालून बारा बलुतेदारांसमवेत पंक्तीत बसल्याने ही मंडळी भारावून गेली.
