
मुंबई : मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
दुष्काळग्रस्त भागात पुराचं पाणी वळवण्याच्या प्रकल्पाला जागतिक बॅंकेनं अर्थसहाय्य करावं असेही ते म्हणाले. जागतिक बॅंकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प, हवामान बदल आणि त्यामुळे कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, बेस्टसाठी इलेक्ट्रीक बसेस याबाबत सविस्तर देखील सविस्त चर्चा करण्यात आली. बेस्टसाठी इलेक्ट्रीकल बसेस, कौशल्य विकास प्रकल्प, पोक्रा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत देखील चर्चा झाली. दरम्यान, जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्रात कौशल्य विकास कामे सुरू असून, त्याद्वारे क्षमता बांधणीस मदत होत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे राज्यातील विविध क्षेत्रातील प्रकल्पांना सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं.