गुंड अमोल भास्कर याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पोस्टर झळकल्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ..

कोल्हापूर : कोल्हापुरात खून, खंडणी, मारामारी, अपहरण आणि सावकारीच्या प्रकरणातील गुंड अमोल भास्कर याच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर झळकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या पोस्टरची सर्वसामान्यामध्ये एकच चर्चा रंगली आहे.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ताराराणी चौकामध्ये भव्य पोस्टर उभारण्यात आले आहे. अट्टल गुंड अमोल भास्कर याने हे पोस्टर लावले आहे.

यावर अमोल भास्करचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केला आहे.क्षीरसागरांच्या वाढदिवसाच्या या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही फोटो असून त्याच्यासोबत अमोल भास्करचा फोटो झळकला आहे. आज, बुधवारी सकाळी हे पोस्टर पाहिल्यानंतर सर्वसामान्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

🤙 8080365706