
मुंबई : ज्येष्ठ निर्माते- दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी नुकतेच अभिनेता सनी देओलवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या सुनील दर्शन हे चर्चेत आहेत.
एका मुलाखतीमध्ये सनी देओलवर सुनील यांनी गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी सांगितलं की, सनीनं त्यांची फसवणूक केली. सनीला खूप अहंकार होता, असंही सुनील यांनी या वेळी सांगितलं.काय म्हणाले सुनील दर्शन?एका मुलाखतीमध्ये सुनील दर्शन यांनी सांगितलं की, सनी देओलला खूप अहंकार होता. 26 वर्षांनंतरही त्याच्याविरुद्धचा खटला सुरू आहे. त्याने मला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले.
पण तो नंतर म्हणाला की त्याच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे मी त्याच्यासोबत चित्रपट बनवावा, असंही त्यानं मला सांगितलं. हे प्रकरण निवृत्त सरन्यायाधीश भरुचा यांच्यासमोर ठेवण्यात आले होते.’सनीनं मला सांगितलं होतं की, त्याच्याकडे माझे पैसे परत करण्यासाठी रोख रक्कम नव्हती. त्यामुळे तो माझ्या चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाला होता. त्यानंतर मी त्याच्याबरोबर बॅक टू बॅक तीन चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यानं मला वेड्यात काढले होते. ‘ असंही दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सांगितलं.
