राज्यपाल भगतसिंह कोश्यारी फौजदारी जनहित याचिका दाखल

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधकांकडून राज्यपालांना आपल्या पदावरुन पायउतार करा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आलीय.

मुंबई हायकोर्टात दीपक जगदेव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात याचिका दाखल केलीय. राज्यपाल वादग्रस्त विधान करुन समाजातील शांतता, एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय.

संबंधित याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय.

🤙 8080365706