हिवताप कर्मचाऱ्यांचे पदोन्नती चा मार्ग मोकळा

पुणे: मा.डॉ. कमलापुरकर मॅडम सहसंचालक, आरोग्य सेवा( ही व ह) पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील दालनामध्ये राज्य हिवताप निर्मूलन संघटनेचे राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे आणि राज्य सरचिटणीस पी.एन. काळे यांच्या नेतृत्वाखाली सभा संपन्न झाली.

राज्यातील हिवताप विभागातील आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व आरोग्य पर्यवेक्षक यांच्या रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ व्हाव्यात. व आश्वासित प्रगती योजनेचा 10/20/30 चा लाभ तात्काळ मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी मा. सहसंचालक मॅडम यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली. चर्चांती मा. सहसंचालक मॅडम यांनी पदोन्नती देत असताना प्रशिक्षणाची अट न लावता विभागीय परीक्षा घेऊन जे पदोन्नतीस पात्र आहेत अशा कर्मचाऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाईल. तसा प्रस्ताव शासनास आजच सादर केला जाईल.

येत्या महिनाभरात पदोन्नतीचे आदेश देण्याचे त्यांनी मान्य केले. तसेच पालघर येथे नव्याने जिल्हा हिवताप कार्यालय सुरू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. सदरचा प्रस्ताव शासनास पाठविला असून त्याचा पाठपुरावा करण्याचे त्यांनी मान्य केले. 54 क्षेत्र कर्मचाऱ्यांमध्ये पदोन्नतीने आरोग्य सेवक या पदावर तात्काळ सामावून घ्या. अशा मागण्या संघटनेचे वतीने करण्यात आल्या. या वेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नितीन कांबळे, श्री के वाय वेदांते, धुळे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मराठे, नाशिक जिल्ह्याचे नितीन ठाकूर, अमरावतीचे विभागीय अध्यक्ष राहुल आटोळे ,चंद्रपूर जिल्ह्याचे हिवताप संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

🤙 8080365706