
मुंबई : खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबद्दल आज का चर्चा होतेय? तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी निखिल खडसे यांनी आत्महत्या केली की त्याचा खून झाला? असा संशय व्यक्त केला आहे.
जळगावच्या राजकारणात कायमच महाजन विरुद्ध खडसे वाद पाहायला मिळतो. त्यात यंदा हा वाद थेट निखिल खडसेंपर्यंत जाऊन पोहचला. कारण गिरीश भाऊंना मुलगा नाही अशा आशयाचं वक्तव्य खडसेंनी केलं होतं, त्यानंतर एकनाथ खडसेंच्या मुलाचं नेमकं झालं काय? हा संशोधनाचा विषय असल्याचं महाजनांनी म्हटलं. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? आता हे प्रकरण पुन्हा एकदा तापलेलं दिसतंय. १ मे २०१३ च्या संध्याकाळी निखिल यांनी मुक्ताईनगरमधील राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यावेळी एकनाथ खडसे हे राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातही या घटनेने खळबळ माजली होती.