
थंडीत बदाम खाणं का गरजेचं आहे, याविषयी यांच्यातर्फे नुकतंच एक संशोधन करण्यात आलं असून त्यामध्ये दररोज किती बदाम खाल्ले पाहिजेत आणि त्याने काय लाभ होतात, याविषयीची माहिती देण्यात आली आहे.
(अभ्यासानुसार प्रौढ व्यक्तीने दिवसभरातून जवळपास २० बदाम खायला पाहिजेत, असं सांगितलं आहे. ते तुम्ही भिजवून खा किंवा भाजून त्याची पावडर करून ती दुधात किंवा अन्य पदार्थांमध्ये टाकूनही घेऊ शकता. त्यातून शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम, कॉपर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, रायबोफ्लेविन मिळतं.
तसंच लोह, पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन बी, थायमिन आणि फॉलेट यांचाही बदाम हा उत्तम स्त्रोत मानला जातो.
बदामाला हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट्ससाठीचं उत्तम स्टोअर हाऊसही म्हणतात.
बदाम नियमित खाल्ल्याने कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह टाईप यांचा धोकाही कमी होत असल्याचं सांगितलं आहे..
बदाममध्ये असणारे ॲण्टी ऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवून संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात
तसेच रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासही बदाम फायदेशीर आहेत. बदाम खाण्याचे पुढील फायदे सांगितले आहेत.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील बॅड काेलेस्टरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
