आळंदी विकासासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करून देणार: चंद्रकांत पाटील

आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

सकाळी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे-पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नगर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश जाधव उपस्थित होते.आळंदी देवस्थानच्या जमिनींवर शासनाकडून गायरान जमिनीचा शेरा दिल्याने जागेच्या विकासावर मर्यादा आल्या.

महसूल मंत्री असताना समितीच्या सदस्यांनी हे निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ वारकरी बांधवांच्या सुविधेसाठी 400 एकर जमीन देवस्थानला देण्याचा निर्णय घेतला.

या जागेच्या विकासासाठी 200 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला पुणे महानगर विकास प्राधिकरणाची मान्यता घेण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल. महसूल मंत्री असताना मंदिर परिसरातील जागेचा प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचं देखील ते म्हणाले.

🤙 8080365706