गोवरचा उद्रेक रोखण्यासाठी महापालिका सज्ज

मुंबई: धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये गोवरचा उद्रेक होऊ नये म्हणून महापालिका सज्ज झाली आहे.त्यानुसार, महापालिकेचा जी-उत्तर विभाग वेगाने काम करत असून, एकूण लोकसंख्येमधील शून्य ते कोणत्याही वयोगटातील कोणतीही व्यक्ती जिला ताप आला आहे वा अंगावर पुरळ आली आहे, त्यांची माहिती आणि ० ते ५ वयोगटातील गोवर व गोवर रुबेला लसीकरणासाठी पात्र लाभार्थी शोधून त्यांचे लसीकरण करणे, या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.

दरम्यान, रविवारी २३ लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.झोपडपट्टीत लसीकरण ८६८ गोवर विरोधी लसीकरणाकरिता पात्र लाभार्थी मुलांचे १० दिवसांत लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रातील नियमित लसीकरण सत्रांसोबत अतिरिक्त लसीकरण सत्रे झोपडपट्टीत भरविले जात आहे.कोणीही सुटणार नाहीआजपर्यंत एकूण ११९ शिबिरांचे आयोजन करण्यात आले. १० दिवसांत ५० लसीकरण शिबिरे आयोजित केली जातील. कोणतेही ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतचे बालक लसीकरणातून सुटणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे.

🤙 8080365706