
मुंबई : पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही तर खात्यावर पेन्शन येणार नाही.
जर अजूनही पेन्शनधारकांनी हे सर्टिफिकेट जमा केलं नसेल तर आजच जमा करा. त्याचं कारण म्हणजे आता नोव्हेंबर महिना संपण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. जर अजूनही सर्टिफिकेट जमा केलं नसेल तर लवकर करून टाका. या आठवड्यात चौथा शनिवार असल्याने बँक बंद राहणार आहे.त्यानंतर रविवार आहे, महिना अखेर असल्याने बँकेत गडबड असू शकते. याच कारणासाठी 5 दिवसात लाईफ सर्टिफेकटची काम तातडीने करून घ्या. आता तुम्हाला बँकेच्या खेटा घालणं जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. काही बँकांनी व्हिडीओ कॉलद्वारे देखील लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची सुविधा सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदा, SBI सारख्या बँका ही सुविधा देत आहेत.
