
मुंबई : कुणी सावरकरांवर प्रश्न उपस्थितीत केले म्हणून पंडीत नेहरूंवर विधान केले पाहिजे, निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही’ असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांना वाद न वाढवण्याची विनंती केली.
कुणी सावरकरांवर प्रश्न उपस्थितीत केले म्हणून पंडीत नेहरूंवर विधान केले पाहिजे, निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही’ असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांना वाद न वाढवण्याची विनंती केली.देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आणि स्वातंत्र्यानंतर देशाला विकासाचा वाटेवर नेण्यात पंडीत नेहरू यांचं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो, तर नेहरू यांनी देशाला विज्ञानाच्या दिशेनं नेण्याचं काम केलं. नाहीतर या देशाचा पाकिस्तान होण्यासाठी वेळ लागली नसती. आज पाकिस्तानची धर्मांध अशी ओळख झाली आहे. पण नेहरूंनी देशाला अशा वाटेवर जाऊ दिलं नाही. या बद्दल देश नेहरू यांचा ऋणी आहे’ असंही राऊत म्हणाले.
