
मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफी मागितल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर गंभीर आरोप केले आहेत.नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली आणि १२ वर्षे भारताची गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली,” असा गंभीर आरोप रणजीत सावरकरांनी केला.
तसेच यावर आता राहुल गांधींनी उत्तर द्यावं, अशी मागणी केली.रणजीत सावरकरांनी आरोप केला, “पंडित जवाहरलाल नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली. १२ वर्षे भारताची सर्व गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली. माझी मागणी आहे की, नेहरू-एडवीना पत्रव्यवहार ब्रिटिशांकडे मागावा आणि ते सर्व जाहीर करावं. त्यानंतरच जनतेला कळेल की, ज्यांना आपण चाच नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फसवणूक केली.”“माझी आणि त्यांची चांगली मैत्री झाली”“९ मे ते १२ मे १९४७ नेहरू एकटेच शिमलाला गेले. तिथं ते कुटुंबासोबत चार दिवस राहिले. त्याबाबत एडवीनाने ब्रिटिश सरकारला लिहिलेल्या पत्रात लिहिलं आहे की, मी नेहरूंना आपले पाहुणे म्हणून बोलावलं. ते अती व्यग्र असल्याने ते ‘नर्व्हस ब्रेक डाऊन’कडे येत आहेत. त्यांनी चार दिवस माझ्यासोबत घालवले. माझी आणि त्यांची चांगली मैत्री झाली. ही मैत्री खूप मोठा काळ टिकेल,” असा दावा रणजीत सावरकर यांनी केला.“यातून एडवीना यांनी नेहरू माझ्या नियंत्रणात आलेत असं ब्रिटिश सरकारला सांगितलं. अधिकृत रिपोर्टमध्ये मैत्रीची भाषा लिहिली जात नाही. हा सरकारी रिपोर्ट आहे,” असा दावा सावरकरांनी केला.
