तर मग भविष्यासाठी कोण भांडणार आदित्य ठाकरेंचा सवाल…

मुंबई : दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यावीर सावकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे देशभर गोंधळ सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता त्याचे पडदास राज्यातील राजकारणावर देखील पहायला मिळत आहे. त्यावर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय.उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी याबाबतीत भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यांच्या भूमिकेशी मी देखील सहमत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. पण आपण सगळे 50 वर्षांपूर्वी किंवा 100 वर्षांपूर्वी कोण योग्य आणि कोण अयोग्य होतं यावर सगळे भांडायला लागलो, असंच राहिलं तर भविष्यासाठी कोण भांडणार?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ठाकरे गटाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. खुद्द आदित्य ठाकरे देखील यात्रेत सामील झाले होते. मात्र, सध्या सावरकर यांच्यावरील वक्तव्यानंतर शिवसेना कुस बदलणार का?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

🤙 8080365706