बॅंकाचा उद्या देशव्यापी संप…

मुंबई : तुमचं बँकेत किंवा बँकेशी संबंधित काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बँकांनी देशव्यापी संप पुकारला आहे.

या देशव्यापी संपामुळे बँकेच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान देशभरात बँकिंग सेवा ठप्प होऊ शकतात, त्यामुळे ग्राहकांनी आपली सर्व महत्त्वाची कामे आजच आटोपून घ्यावी, जेणेकरुन त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही.19 नोव्हेंबर रोजी बँकांचा संपऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ने कॅथोलिक सीरियन बँक आणि डीबीएस बँकेच्या कर्मचार्‍यांना 11 व्या द्विपक्षीय वेतन सुधारणा नाकारण्यासह कायमस्वरुपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग (कॅश मूव्हमेंट जॉब आणि हाऊसकीपिंग जॉब) आणि काही बँकांमधील नोकरीच्या सुरक्षिततेला धोका यासह अनेक मुद्द्यांच्या निषेधार्थ 19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशनच्या बैठकीत तोडगा नाहीकर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेत कोणताही सकारात्मक किंवा समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे बँक युनियन्सने 19 नोव्हेंबरचा नियोजित देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. “आयबीए आणि बँक व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेनंतर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे 19 नोव्हेंबर नियोजित संप सुरुच ठेवू असं आम्ही त्यांना सांगितलं. तसंच मुख्य कामगार आयुक्तांनाही कळवलं आहे, असं एआयबीईएचे सरचिटणीस व्यंकटचलम यांनी सांगितलं.

🤙 8080365706