हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त करवीर शिवसेनेच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

कोल्हापूर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त करवीर शिवसेनेच्या वतीने गांधीनगर येथील सिंधु मार्केट मध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी “अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे”, ” परत या परत या बाळासाहेब परत या” या घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, विभागप्रमुख दिपक पोपटाणी (फ्रेमवाला), ग्राहक संघटनेचे तालुकाअध्यक्ष जितेंद्र कुबडे, गांधीनगरच्या माजी सरपंच रितू लालवानी, शाखाप्रमुख दिपक अंकल, उपशाखाप्रमुख सुनिल पारपाणी, फेरीवाला संघटनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, कमल धामेजा, धानुमल गजवानी, अमिताभ पोपटाणी, सुरेश माळी आदी उपस्थित होते.

🤙 8080365706