
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी टीका केली आहे.राहुल गांधी यांचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचं ते म्हणाले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा आणि त्यांना कायद्याचं राज्य असल्याचं दाखवून द्या अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.हे राज्य कायद्याचं आणि सावरकरांचं आहे असं दाखवून देऊया असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
