एकनाथ खडसे – गिरीश महाजन संघर्ष पेटण्याची शक्यता

जळगाव : एकनाथ खडसेंनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन, साधना महाजन तुमच्या कुटुंबातील की बाहेरच्या? असा सवाल करत दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही. नाहीतर कदाचित तो पण राजकारणात आला असता, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे.

गिरीश महाजन यांनी नंदुरबार येथे एकनाथ खडसे यांना सर्व पदे घरात पाहिजेत, अशी टीका केली होती. त्या टिकेला प्रत्युत्तर देतांना एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर निशाणा साधणा साधला. गिरीश महाजनांच्या आरोपाला प्रत्युत्तर देतांना एकनाथ खडसेंनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एकनाथ खडसे यांना सर्व पदे ही घरातच पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नंदुरबार येथे केली होती.

दरम्यान, गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेच्या अध्यक्ष या पदावर कायम का आहेत? साधना महाजन तुमच्या कुटुंबातल्या की बाहेरच्या आहेत? दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही नाहीतर कदाचित मुलगा राजकारणात आला असता, असे वादग्रस्त विधान करत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

🤙 8080365706