अन्यथा हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार ; या नेत्याचा आक्रमक पवित्रा…

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिलाय. सोयाबीन-कापूस प्रश्नांचं निरसन झालं नाही तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार”, असा इशारा देत रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार नेमकी काय भूमिका घेतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशाऱ्याची दखल घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे हजारो शेतकरी खरंच अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आंदोलनासाठी आले तर पोलिसांवरील ताणही वाढू शकतो. त्यामुळे राज्य सरकार काय भूमिका घेतं याकडे अनेकांचं लक्ष आहे.

🤙 8080365706