
कागल : राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व जिजाऊ महिला महिला समिती कागल यांच्या वतीने कागल येथे दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे अशी माहिती राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्र शासनाने यावर्षी मोठी मेघा पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे याचा लाभ सर्वसामान्य युवक- युवती ना व्हावा या उद्देशाने शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेच्या आयोजन केले आहे.पोलिस भरतीचा सराव करणा-या युवकांना पोलिस भरती मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे स्वरूप समजावे व मैदानावरील प्रात्यक्षिकांचा सराव व्हावा या एकमेव हेतूने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
एक दिवसाच्या या प्रशिक्षण कार्यशाळेचे स्वरूप सकाळी सकाळी 9 ते 10 उपस्थितीची नाव नोंदणी.स. 11 ते दु.12 .30 लेखी पेपर . दुपारी 1.30 ते 3 मार्गदर्शनपर व्याख्यान, व दुपारी 3 ते 4 मैदानावरील प्रात्यक्षिक व मार्गदर्शन असे असून ही स्पर्धा कागल येथे श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व जुनियर कॉलेज कागल व जागृती हायस्कूल गडहिंग्लज या ठिकाणी होणार आहे. तरी,इच्छुक उमेदवारांनी या कार्यशाळेसाठी आपली नाव नोंदणी दी. 24 नोव्हेंबर 2022 अखेर करावी असे आवाहन ही प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
