सहकारी साखर कारखाना निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक आघाडीवर..

कोल्हापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये निकालाच्या पहिल्या फेरीत २८ केंद्रांवरील मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची ‘कपबशी’ (भीमा परिवार पॅनेल) आघाडीवर आहे.

त्यामुळे मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील महाडिक समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल दोन फेरीत होणार असून, पहिल्या फेरीचा निकाल हाती लागला आहे. पहिल्या फेरीत २८ केंद्रावरील ७५०० मतांची मोजणी झाली आहे. दुसऱ्या फेरीतही तेवढेच मतदान आहे. दुसऱ्या फेरीमध्ये खासदार धनंजय महाडिक हे आघाडीवर राहिले, तर त्यांची भिमा कारखान्यावर एक हाती सत्ता येणार आहे.

🤙 8080365706