सांगली: पेरू लागवडीकडे वाढला शेतकऱ्यांचा कल

सांगली ः जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.परिणामी या पिकांची नव्याने लागवड करण्यासाठी उत्साही नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यायी पीक म्हणून पेरू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी २४७ हेक्टरवर पेरूची लागवड होती. २०२१-२०२२ मध्ये ६३१ हेक्टरवर झाली आहे. अर्थात, तीन वर्षांत ३८४ हेक्टरने पेरूच्या लागवडीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत द्राक्ष आणि डाळिंब पिकाच्या क्षेत्रात वाढ होताना दिसले. दुष्काळी पट्ट्यात या दोन्ही पिकांना टँकरने पाणी घालून जगविले. त्यातून शेतकरी आर्थिक प्रगतिपथावर पोहोचू लागला : पुरंदर पेरूचा केक बाजारातदरम्यान, गेल्या तीन ते चार वर्षांपासून अतिवृष्टी, अवकाळी आणि परतीचा पाऊस या साऱ्याचा फटका या दोन्ही पिकांना बसू लागला. त्यातच डाळिंबावर खोडकिडीचा (पीन होल बोअरर) प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात येऊ लागले. खर्चात वाढ होत असल्याने आर्थिक ताळमेळ बसणे मुश्कील बनले.जुन्या आणि रोगाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी काढून टाकल्या. परंतु डाळिंब आणि द्राक्षाची नवी लागवड करण्यास शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. या दोन्ही पिकांना पेरू या पिकाचा पर्याय शोधून जिल्‍ह्यात पेरूची लागवड करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत पेरूच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

🤙 8080365706