सुर्वे नगरात वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी जळून खाक…

कळंबा : कोल्हापूर येथील सुर्वे नगर प्रभागातील दत्त जनाई नगर मध्ये एक धक्कादायक घटना घडली असून एका तरुणाने हौसेने घेतलेली 21 लाखाची दुचाकी चक्क जळून खाक झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर एक महिन्यापूर्वीच दत्त जनाई नगरमधील एका तरुणाने मोठ्या हौसेने वाजत-गाजत २१ लाखाची दुचाकी घरी नेली होती. ही दुचाकीबघायला नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली होती. तीच २१ लाखाची दुचाकी आगीत जळून खाक झाली. या दुचाकीसह एक कारही जळाली. आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घटलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, ही आग नेमकी कशी लागली? की अज्ञातांनी लावली याबाबत गूढ कायम आहे.

गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने निव्वळ सांगाडे शिल्लक राहिले होते. आग लागली की अज्ञातांनी आग लावली हे स्पष्ट होत नसल्याने चौगुले कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

🤙 8080365706