मिरज : मध्य रेल्वेतर्फे मुंबई शहरातील रोड ओव्हर ब्रिज हटविण्यासाठी शनिवार, १९ नोव्हेंबर व रविवार, २० नोव्हेंबरदरम्यान २७ तासांचा वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शनिवारी कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस व रविवारी मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर – मुंबई कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच जाणार असून, रविवार, २० नोव्हेंबर रोजी कोयना एक्स्प्रेस पुण्यातूनच कोल्हापूरला येणार आहे.
