आठ दिवस नॉट रीचेबल असणाऱ्या अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण..

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मागील काही दिवसांपासून राज्यासह माध्यासमोर न दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाष्य करत पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मी नाराज असल्याच्या अफवा आहेत. पाच दिवस मी आजारी होतो. त्यामुळे मी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली नव्हती. खोकला सुरू झाला होता, त्यात प्रकृती बरी नव्हती. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या, असे म्हणत नाराजीच्या चर्चांना अजित पवारांनी पुर्णविराम दिला.तसेच, माझा खासगी दौरा होता. सहा महिन्यापूर्वी मी तिकीट काढली होती. मला खासगी आयुष्यदेखील आहे. असही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

🤙 8080365706