भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचू न शकल्याने क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा पडली आहे. यावर माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने परखड शब्दात भारतीय संघावर टीका केली आहे.

घरात एकच वयस्कर व्यक्ती असली पाहिजे, सात असल्या तर मग समस्या आहे,” असं स्पष्ट मत अजय जडेजाने मांडलं. अजय जडेजाने या वक्तव्याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे भारतीय संघात एकापेक्षा जास्त कर्णधार असण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं.
भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचू न शकल्याने क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा पडली आहे. इंग्लंडने १० गडी राखून केलेल्या दणदणीत पराभवामुळे भारतीय संघाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळालं.या पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत असून पराभवाच्या कारणांवर चर्चा केली जात आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू अजय जडेजानेही या पराभवावर स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं आहे. गेल्या १२ महिन्यांमध्ये झालेल्या अनेक मालिकांमधील रोहित शर्माच्या अनुपस्थितीवर अजय जडेजाने बोट ठेवलं आहे.
एकाच घरात सात वयस्कर व्यक्ती ; अजय जडेजाचे भारतीय संघावर टीकास्त्र भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचू न शकल्याने क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा पडली आहे. यावर माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने परखड शब्दात भारतीय संघावर टीका केली आहे.घरात एकच वयस्कर व्यक्ती असली पाहिजे, सात असल्या तर मग समस्या आहे,” असं स्पष्ट मत अजय जडेजाने मांडलं. अजय जडेजाने या वक्तव्याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे भारतीय संघात एकापेक्षा जास्त कर्णधार असण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं. भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचू न शकल्याने क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा पडली आहे. इंग्लंडने १० गडी राखून केलेल्या दणदणीत पराभवामुळे भारतीय संघाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळालं.या पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत असून पराभवाच्या कारणांवर चर्चा केली जात आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू अजय जडेजानेही या पराभवावर स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं आहे. गेल्या १२ महिन्यांमध्ये झालेल्या अनेक मालिकांमधील रोहित शर्माच्या अनुपस्थितीवर अजय जडेजाने बोट ठेवलं आहे. रोहित शर्मा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक सीरिजमध्ये अनुपस्थित असताना हार्दिक पांड्या, के एल राहुल अशा अनेक खेळाडूंकडे भारतीय संघाचं कर्णधारपद सोपवलं जात आहे. अजय जडेजाने यावर नाराजी जाहीर केली आहे. जर तुम्हाला वर्ल्डकपसाठी संघ तयार करायचा असेल तर संघाला सात नव्हे, तर फक्त एकच वयस्कर (कर्णधार) खेळाडूची गरज आहे असं अजय जडेजाने म्हटले आहे. रोहित शर्मा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक सीरिजमध्ये अनुपस्थित असताना हार्दिक पांड्या, के एल राहुल अशा अनेक खेळाडूंकडे भारतीय संघाचं कर्णधारपद सोपवलं जात आहे. अजय जडेजाने यावर नाराजी जाहीर केली आहे. जर तुम्हाला वर्ल्डकपसाठी संघ तयार करायचा असेल तर संघाला सात नव्हे, तर फक्त एकच वयस्कर (कर्णधार) खेळाडूची गरज आहे असं अजय जडेजाने म्हटले आहे.
