नागपूर: विदर्भ राज्य आंदोलन समितीने आता थेट विदर्भातील खासदारांनाच घेरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यासह विदर्भातील दहा खासदारांचे ही समिती राजीनामे मागणार आहेत.

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून विदर्भ राज्य आंदोलन समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून विदर्भातील खासदारांनाच घेरण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील दहाही खासदारांनी विदर्भ स्वतंत्र होण्यासाठी काहीच प्रयत्न केला नसल्याची या समितीची भावना झाली आहे. त्यामुळेच या समितीने दहाही खासदारांचा राजीनामा मागण्याचा निर्णय घेतला आहे.