कोल्हापुरात  ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या राज्यपालांच्या उपस्थितीत आज (शुक्रवारी) कोल्हापूरात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक आयोजित करण्यात आली आहे. येथील रेसिडन्सी क्लबमध्ये ही बैठक सुरु आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु आहे. 

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूरचे जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे सीमाभागातील बेळगाव, विजयपुरा, कलबुर्गी, आणि बिदरचे जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सीमाभागात भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सीमाभागात हत्तींमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचे प्रश्न उपस्थितित होण्याची शक्यता आहे. 

🤙 8080365706