भारत-बांगलादेश सामन्यात पावसाची खेळी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी२० विश्वचषकात आज (बुधवारी) भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडियाने २० षटकांत ६ बाद १८४ धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी १८५ धावा करायच्या आहेत. दरम्यान, सामन्यादरम्यान पावसाने  हजेरी लावल्याने हा सामना थांबवण्यात आला आहे. सध्या सामन्यात डकवर्थ लुईसच्या नियमानुसार बांगलादेश १७ धावांनी पुढे आहे.

🤙 9921334545