गोकुळतर्फे ‘गोकुळश्री’ स्पर्धेचे आयोजन-चेअरमन विश्‍वास पाटील

कोल्‍हापूर (प्रतिनिधी): गोकुळ दूध संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गोकुळश्री’ स्पर्धेत जास्‍तीत जास्‍त दूध उत्‍पादकांनी भाग घ्यावा असे आवाहन  चेअरमन विश्‍वास पाटील यांनी केले आहे. सदरची स्‍पर्धा दि.१६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत कोणतीही पूर्वसूचना न देता घेतली जाणार असल्याचे ही पाटील यांनी सांगितले आहे.

गोकुळतर्फे ही स्पर्धा गेल्या २७ ते २८ वर्षांपासून घेण्यात येते. दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी-म्हैशींकरीता ‘गोकुळश्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गोकुळशी सलग्न असणाऱ्या सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरीता या स्पर्धा प्रतिवर्षी घेण्यात येतात. ‘गोकुळश्री’ स्पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता वाढविणे याचबरोबर दुग्ध व्यवसायामधून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ करुन देणे तसेच तरुण पिढीला या व्यवसायाकडे आकर्षीत करुन दुग्ध व्यवसाय वाढविणे हा आहे.

या स्‍पर्धेसाठी संघाचे बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात १२ नोव्हेंबर पर्यंत दूध संस्‍थे मार्फत आपली नावे नोंद करावीत. स्‍पर्धेमध्‍ये म्‍हैस १ ते ३ व गाय १ ते ३ क्रमांक काढण्यात येणार असून स्‍पर्धेचे नियम व अटी परिपत्रकाद्वारे पाठवले आहेत अशी माहिती चेअरमन पाटील यांनी दिली.

🤙 8080365706