अन् कोहली संतापला…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  टी-20 विश्वचषकासाठी संपूर्ण भारतीय टीम सध्या  ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहली ज्या हॉटेलमध्ये राहतोय, त्या हॉटेलमधील त्याच्या रुमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. हॉटेल रुमचा हा व्हीडिओ लीक झाल्याने कोहली चांगलाच संतापला.

सध्या टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये हॉटेल क्राऊन राहत आहेत. दरम्यान या हॉटेलमधील विराट कोहलीच्या रुममधील व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी आता हॉटेल क्राऊन पर्थने माफी मागितली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कोहलीने इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला होता. त्यानंतर हॉटेलने विराटची माफी मागितली आहे. दरम्यान कोहलीच्या पोस्टनंतर पर्थमधील हॉटेल क्राऊननं माफी मागितलीय..  तसंच हा व्हीडिओ बनवणारा आणि तो पोस्ट करणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्याला हटवण्यात आलं आहे.

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी नाराजी आणि संताप व्यक्त केला होता. विराटने पोस्टमध्ये लिहिलं की, ‘हे वागणं योग्य नाही. या व्हिडीओमुळे माझ्या प्रायव्हसीबद्दल  प्रश्न उपस्थित झाला आहे.’ कोहलीने चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि प्रायव्हसीचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे.