जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं लोकार्पण !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात उंच असणाऱ्या भगवान शंकराच्या प्रतिकृतीचे आज करण्यात येणार आहे. राजस्थानमधील नाथद्वारा येथे ही मूर्ती उभारण्यात आली आहे. या मूर्तीची उंची ३६९ फुट इतकी आहे.

या उंच शिवप्रतिमेला ‘विश्वास स्वरूपम’ नाव देण्यात आलं आहे. ‘विश्वास स्वरूपम’ प्रतिमेचं लोकार्पण आज होणार आहे. हा कार्यक्रम २९ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या भव्य मूर्ती लोकार्पणाचा कार्यक्रम प्रसिद्ध कथावाचक मुरारी बापू, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते पार पडणार आहे. यासाठी मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिसरात नऊ दिवस मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे.

नाथद्वाराच्या गणेश टेकडीवर ही भव्य मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये भगवान शंकर ध्यान मुद्रेमध्ये बसलेले दिसत आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी १० वर्षे लागली. २०१२  साली ही मूर्ती उभारण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर आता २०२२  मध्ये ही मूर्ती पूर्ण तयार झाली आहे.