खा.धनंजय महाडिक यांच्यावतीने फराळ स्नेहमिलन  कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी): दीपावलीसणानिमित्तसमाजातील विविध घटकांमध्ये स्नेहाचे बंध निर्माण व्हावेत आणि परस्पर संवाद  वाढीस लागावा, या हेतूने खासदार धनंजय महाडिक यांनी  फराळ स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता. महासैनिक दरबार हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या या मेळाव्याला आजीमाजी लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील  मान्यवरांनी उपस्थिती लावून फराळाचा आस्वाद घेतला.


खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने दीपावली सणाचे औचित्य साधून, फराळस्नेहमेळावा आयोजित करण्यात आला  होता. खासदार धनंजय महाडिक,अरूंधती महाडिक,पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांनी  उपस्थितांचे स्वागत केले. 

या कार्यक्रमाला श्रीमंत शाहू महाराज यांनी उपस्थिती लावून महाडिक परिवाराला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, भरमूआण्णा पाटील,  संग्रामसिंह कुपेकर, भगवान काटे, समरजितसिंह घाटगे, राहूल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, डॉ. प्रकाश संघवी, डॉ. अशोक भूपाळी, सुरेशदादा पाटील, भरत पाटील, अरूण इंगवले, सत्यजीत कदम, चंद्रकांत घाटगे, राजसिंह शेळके,  विजयसिंह खाडेपाटील, रशीद बारगीर, रूपाराणी निकम, संगीता खाडे, गायत्री राऊत, रवींद्र मुतगी, नंदकुमार मराठे, हसन  देसाई, सुंदर देसाई, विजया पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी मेळाव्याला उपस्थिती लावली. तर सकाळ समुहाचे  संचालक संपादक श्रीराम पवार, लोकमतचे मकरंद देशमुख, विठ्ठल पाटील, रितेश पाटील, समीर देशपांडे, सतीश सरीकर,  जिल्हा परिषदेचे आजीमाजी पदाधिकारी,साखर कारखान्याचे संचालक, सेवा संस्था- दूध संस्था, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, धनंजय महाडिक  युवाशक्ती चे कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545