गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीची घोषणा करण्यात आली आहे.

या आघाडीत माजी मंत्री आ.हसन मुश्रीफ, आ.सतेज पाटील, प्रकाश शहापूरकर, अप्पी पाटील, हतरगी गट, कुराडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कुपेकर गट यांचा समावेश आहे. नुकतीच या आघाडीची घोषणा करण्यात आली.
छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे :
व्यक्ती उत्पादक सभासद गट,कोलगे कडगाव गट क्र.एक-प्रकाश शहापूरकर, विश्वनाथ स्वामी, बाळासो देसाई.
हनीमनाळ गट क्रमांक दोन-शिवराज मलगोंडा पाटील, अशोक मेंडूले, अक्षय कुमार, सरदार पाटील.
भडगाव मुगळी गट क्रमांक तीन-प्रकाश चव्हाण, सतीश बिमगोंडा पाटील,
नुल गट क्रमांक चार-रवींद्र बाबासो पाटील, सदानंद आर राजकुमार हत्तरगी.
महागाव हरळी गट क्रमांक पाच-भरुमु कृष्णा जाधव, प्रकाश धोंडीराम पताडे, विद्याधर बाबुराव गुरबे.
संस्था बिगर उत्पादक गट क्रमांक दोन-सोमनाथ विनायक पाटील.
अनुसूचित जाती जमाती गट-काशिनाथ शिवाप्पा कांबळे.
महिला सदस्य गट-कविता प्रकाश पाटील, मंगल बसवराज आरबोळे.
इतर मागासवर्गीय गट-दिग्विजय किसनराव कुराडे.
भटक्या विमुक्त जाती गट-अरुण प्रभाकर गवळी.