कोल्हापूर : कोल्हापूर साईक्स एक्सटेन्शन लोहिया गल्ली येथील रस्त्याच्या कडेला असलेले 50 वर्ष जुने झाड तोडण्यात आले, त्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हे झाड तोडले गेले आहे, झाडावरील पक्ष्यांच्या अधीवासाची कोणीही चिंता न करता अशा प्रकारचे गैरकृत्य केले गेले आहे.

अग्निशमन दलाकडू ही कारवाई करण्यात आली आहे, हे झाड का तोडले? असे विचारणा केल्यानंतर अग्निशमन दलातील जवान म्हणाले झाडावर वटवाघूळ अडकले होते, त्यामुळे आम्ही हे झाड तोडले आहे.
त्यासाठी पन्नास वर्षे जुने झाड तोडणे हा पर्याय आहे काय? वृक्ष ही राष्ट्रीय संपत्ती आहे, महानगरपालिका एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असे म्हणून दुसरीकडे जर असे मोठमोठे वृक्ष तोडत असेल तर दाद कोणाकडे मागायची? असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत व झाड का तोडले याची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. कारण झाडाच्या मुळात जाळ करून झाडाला मारण्याचा या प्रयत्न पूर्वी केला आहे, या झाडाचा खरंच कुणाला त्रास होता काय? याची चौकशी व्हावी अशी मागणी लोक करत आहेत.