कोल्हापूर (प्रतिनिधी) : फुलेवाडी रिंगरोड येथील तामजाई काँलनी मधील सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्या घरी वसुबरसनिमित्त गाय-वासरूंची पुजा आयोजित करण्यात आली होती.

भारतीय संस्कृतीत गाईला असाधारण महत्त्व आहे. गाय व वासरु हा भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे. तो नवनिर्मितीचा आणि सेवेचा हुंकार आहे. त्यामुळेच दीपावली सणाची सुरुवात वसुबारसने होते. याच प्रथेचे पालन करत राजोपाध्ये नगर परीसरातील प्रथमेश क्षीरसागर यांची खिलार जातीची गाय व वासरू यांची पुजा श्रीमती शारदा सिद्धाप्पा पाटील यांच्या हस्ते गाईची पुजा करण्यात आली. भारतीय सण पारंपारिक पद्धतीने साजरे करून संस्कृती टिकविण्यासाठी व संस्कार समाजात रुजवण्यासाठी पाटील परिवार नेहमीच प्रयत्न करत असतो.
यावेळी वैशाली पाटील,अनुराधा वनकुंद्रे,जयश्री भाट,पुजा सातपुते,सुजाता लळीत, रेखा साखळकर,अंजली कुराडे,वंदना सुतार,दिपाली चांदम तसेच परिसरातील नागरीकांनी गोमातेचे पुजन केले.