‘त्या’ शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे सर्वेक्षण करणार-आ.प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : कै.सुशिलादेवी आनंदराव आबिटकर ॲग्रीकल्चर फौंडेशन व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने एकरी ६० टन ऊस उत्पादकता वाढ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या अभियानामध्ये सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांच्या एकरी ६० टन ऊसाचे सर्वेक्षण कृषि विभाग व सुशिलादेवी आबिटकर ॲग्रीकल्चर फौंडेशन मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांची प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, एकरी ६० टन ऊस उत्पादकता वाढ स्पर्धा राधानगरी, भुदरगड व आजरा या तीन तालुक्यांसाठी स्वतंत्ररित्या आयोजित करण्यात आली आहे. कृषि विभाग व सुशिलादेवी आबिटकर ॲग्रीकल्चर फौंडेशनमार्फत शेतकऱ्यांच्या ऊसाची पहाणी करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यातून ३ क्रमांक काढण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकाकरीता २५ हजार व सन्मान चिन्ह, व्दितीय क्रमांकारीता १५ हजार व सन्मान चिन्ह व तृतिय क्रमांकासाठी ११ हजार व सन्मान चिन्ह देवून शेतकऱ्यांना गौरविण्यात येणार आहे.

भुदरगड तालुक्यातील सर्वेक्षण करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी भुदरगड किरण पाटील (9689381939), राधानगरी तालुका सुनिल कांबळे (9370310752), आजरा तालुका कृषि अधिकारी मोमीन (8830382429) व सुशिलादेवी आबिटकर ॲग्रीकल्चर फौंडेशनचे सुरज चौगले (9067877982) हे येणार असून शेतकऱ्यांना या संपर्क क्रमांकाना संपर्क करण्याचे आवाहन आमदार आबिटकर यांनी केले आहे. तसेच नवीन ऊस पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीच्या मातीचे परिक्षण, जैविक खते, किटकनाशके यांचा वापर करुन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीचे उत्पन्न वाढविण्यातबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यातत येणार आहे.

🤙 9921334545