बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील वैतागवाडी (विजयानगर) येथे छत्रपती संभाजीराजे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. सज्जन भानुदास दिसले यांच्या शेताला भेट देवून त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संभाजीराजेंनी धीर दिला.अतिवृष्टीमुळे सोयाबीन तसेच कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने ऐनदिवाळीच्या तोंडावर शेतकरी हताश झाले आहेत.