कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रच्या वतीने १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त रविवार (दि.१६ ऑक्टोबर) रोजी संघाच्या वतीने जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीचे उद्घाटन डॉ.संदीप पाटील यांच्या हस्ते आणि डॉ. विजय इराणी, डॉ. बळवंत दांडेकर, बँक ऑफ इंडिया एसी, एसटी, ओबीसी संघटनेचे पदाधिकारी चंद्रकांत घोडसकर आणि संजय कांबळे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

दसरा चौक येथील शाहू महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून ही फेरी लक्ष्मीपुरी-बिंदू चौक-शिवाजी पुतळा-गुजरी-महाद्वार रोड या मार्गे काढण्यात आली. यावेळी अंध बांधवांना रस्ता पास करण्याचे प्रात्येक्षिक दाखवण्यात आले.

त्यानंतर जैन समाजाच्या सभागृहामध्ये शंभर ते दीडशे अंध व्यक्तींना पांढरी काठी तथा दिवाळी गिफ्ट, मिठाई वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वालावलकर कापड दुकान, भंडारे ड्रायफूट्स, आमदार ऋतुराज पाटील व्यासपीठ संस्थेचे अशोक पाटील, मारुती पाटील, पोहाळे गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब तावडे, वागवे गावचे माजी सरपंच संजय सुतार, दिनेश शेलार, कोल्हापूर अंधशाळेचे माजी मुख्याध्यापक वसंत सुतार या सर्वांनी संघटनेला आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत केली.
यावेळी शाखेचे कोषाध्यक्ष सुशील पाटील, कार्यकारणी सदस्य अभिजीत खामकर, विशाल पोळे, ज्योतीराम कणसे, जिल्हा शाखेचे महासचिव शरद पाटील, अध्यक्ष रवी कांबळे, सचिव संत कुमार कांबळे, कोषाध्यक्ष रघुनाथ खोत, उपाध्यक्ष अमोल कुंभार आदी उपस्थित होते.