कोल्हापूर (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील फये येथे सरपंचपदी शिंदे गटाच्या नकुशी घरे विजयी झाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हयात प्रथमच शिंदे गटाचे खाते खोलले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या चार ग्रामपंचायतीचा निकाल आज (सोमवारी) स्पष्ट झाला. फये ग्रामपंचायत मधील सात पैकी तीन जागांवर शिंदे आणि भाजप गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. सर्वाधिक जागा राष्ट्रवादी कॉग्रेसने जिंकल्या असल्या तरी सरपंच पदाच्या उमेदवारावर शिंदे आणि भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. प्रामुख्याने या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे गट-भाजप यांच्यात लढत झाली.
