गांधीनगर : दिवाळी सणाला गांधीनगरमध्ये खरेदीसाठी वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच ग्राहकाला सर्वत्र खरेदी करता यावे याबाबत योग्य ती उपाय योजना करावी, अशी मागणी करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगर पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड, इलेक्ट्रीकल, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक अशा सर्व वस्तु होलसेल व रिटेल मिळण्याचे गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठ आहे. गांधीनगरमध्ये खरेदीसाठी मोठी झुंबड उडते त्यामुळे दिवाळी सणाला बाजारपेठे मध्ये मोठी गर्दी होते. त्यावेळी पोलीस खाते वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून सर्व उपाय योजना करते सदर भागामध्ये १०० ते १५० ट्रन्सपोर्टची ऑफिस व मोठ मोठी गोडावून असून रोज मोठ्या प्रमाणात मालाची ने-आन ह्या रोड वरून होते. याबाबत आपण ट्रान्सपोर्ट वाल्यांना योग्य ती वेळ देवून वाहतुकीची कोंडी होणार नाही. याबाबत योग्य त्या उपाय योजना कराव्यात. तसेच खरेदीला चार चाकी वाहने घेवून येणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. सदर वाहने आपण विठ भट्टी परिसरात पार्किंग केले जाते व गणेशचित्र मंदिराजवळून वाहने वळवतात. सध्या रस्त्याला असणाऱ्या मोठ मोठ्या वृक्षांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तोड झाल्याने रस्ता मोठा झाला असून सदर भागामध्ये सम-विषम पार्किंगचे नियोजन करावे. तसेच चार चाकी वाहने आपण विट भट्टी जवळ थांबवल्याने ग्राहक तेथेच आसपास खरेदी करतो. पुढे सिंधु मार्केट, गुरूनानक मार्केट, झुलेलाल मार्केट व रेल्वे स्टेशन रोड वरील मार्केट या भागामध्ये मोठ मोठी रिटेल दुकाने असून त्यांना ही मोठ्या रकमेचे भाडे असून सदर वाहने ही विट भट्टी परिसरात थांबवल्याने ग्राहक खरेदीसाठी वरती येत नाही. त्यामुळे वरील व्यापाऱ्याचे मोठे नुकसान होते. पुढे ग्रामपंचायत जवळ हेमूकलानी शाळेच्या आवारात वळीवडे रोड वरती व रेल्वे स्टेशन जवळ पार्किंग होवू शकते तरी वरील मार्केटात ग्राहकांना खरेदी करावयाची असेल तर त्यांच्या पार्किंगची व्यवस्था वरील ठिकाणी करावी व संपुर्ण गांधीनगर बाजारापेठेत खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांचे योग्य नियोजन करून ग्राहकांना संपुर्ण गांधीनगर बाजारपेठेत खरेदी करता यावे. याबाबत आपण योग्य ते वाहतुकीचे नियोजन करावे ही विनंती.
या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज आनंदराव खोत यांनी हे निवेदन स्वीकारले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, हिंदुत्ववादी शरद माळी, विभागप्रमुख विरेंद्र भोपळे, फेरीवाले संघटनेचे तालुकाप्रमुख कैलाश जाधव व उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, विभागप्रमुख दिपक पोपटाणी (फ्रेमवाला,) शाखाप्रमुख दिपक अंकल , योगेश लोहार, बाबुराव पाटील,किशोर कामरा, आबा जाधव, बंडू घोरपडे, सुनिल पारपाणी, जितू चावला,नागेश शिरवटे, सागर माने, राजू जाधव आदी उपस्थित होते.
