राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत,महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभाच लोढा हे देखील उपस्थित होते.

साडेतीनच्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आरोग्यविषयक मुद्दे हे भेटीचं प्रमुख कारण असलं तरी यात राजकीय चर्चा होणार नाही, असं होऊ शकणार नाही. आरोग्यविषयक चर्चेसोबतच पुढील महिन्यात होणाऱ्या अंधेरी पूर्व  पोटनिवडणुकीबाबतही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार का याकडे लक्ष असणार आहे.

🤙 9921334545