मराठा भवनसाठी लागेल ते सहकार्य करू-आ.हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात मराठा भवन उभारण्यासाठी पडेल ती किंमत मोजू आणि वसंतराव मुळीक-नाना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

      

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचा कोल्हापुरात ६७ व्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक सत्कार आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी वसंतराव मुळीक यांना शाहू महाराजांच्या हस्ते चारचाकीही प्रदान करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर वैधानिक महाराष्ट्र विकास मंडळाचे माजी अध्यक्ष उल्हासदादा पवार, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव, आमदार जयंत आसगांवकर, राहुल चिकोडे आदी प्रमुख उपस्थित होते.