केंद्र सरकारकडून NRC ची प्रक्रिया सुरू?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  दोन वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील नागरिकांची माहिती जमा असणारे डेटाबेस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये देशातील नागरिकांच्या जन्म-मृत्यूची माहिती असणार आहे. गृहमंत्रालयाने एका विधेयकातून याचा खुलासा झाला आहे. सध्या राज्यातील स्थानिक प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या जन्म-मृत्यूची नोंद ठेवली जाते. 

आधार कार्ड हे मतदार ओळखपत्राशी लिंक करणे हे ऐच्छिक असले तरी  निवडणूक आयोगाने सादर केलेल्या प्रस्तावाला जोरदार विरोध करण्यात आला होता. आता मात्र, केंद्र सरकार या डेटाबेसमध्ये जन्म नोंदणी, मतदार यादी, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आणि वाहन चालवण्याचा परवाना आदी माहिती असणार आहे. नव्याने तयार होणाऱ्या डेटाबेसमध्ये या माहितीचा समावेश असावा यासाठी जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यात दुरुस्ती करण्यात  येणार आहे. 

‘एनडीटीव्ही’च्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे या डेटाबेसची जबाबदारी असणार आहे. त्यांच्यासह राज्यांमधील मुख्य रजिस्ट्रारदेखील हे काम करतील. रजिस्ट्रार हे आधार, शिधापत्रिका, मतदार याद्या, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रभारी विविध एजन्सींना वेळोवेळी अपडेट करतील. केंद्र सरकारकडून याबाबतचे विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

🤙 9921334545