गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल

बारामती (प्रतिनिधी): एक राजा होता आणि त्याचा हात लागला तर कुठल्याही वस्तूचं सोनं होतं, असं मी ऐकलं होतं. बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात लागला तर राख होते हे आता मी प्रत्यक्षात बघितलं. राष्ट्रवादीच्या नादाला जो जो लागेल त्याची राख होत आहे. आता शिवसेनेचं काय झालं ते आपल्या समोर आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते बारामतीत बोलत होते.

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यामध्ये अंतर आलं पाहिजे, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यांना शिवसेनेला पूर्णपणे संपवायचं होतं, ते त्यांनी केलं,असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून त्यांना खंजीर चिन्ह दिलं पाहिजे होतं. यांना मशाल आता रुजवायला वेळ लागेल. खंजीर म्हटलं तर लोकांच्या लक्षात आलं असतं, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचा  जन्मच खंजीरातून झालेला आहे आणि आता नवा एक खंजीर घुसवणारा निर्माण पवारांनी केलेला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवून सेना आणि राष्ट्रवादीला खंजीर चिन्ह द्या, असं  मी निवडणूक आयोगाला पत्र लिहीन मात्र फक्त ते खंजीर एकमेकांत घुसवू नका, असा सल्लादेखील त्यांनी दिला. 

🤙 9921334545