…तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू ?

मुंबई (वृत्तसंस्था) : घरावर शिवसेनेचे व स्वाभिमानेच बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. मऱ्हाठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस! मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात ‘संजय’ कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? असा प्रश्न राऊत यांनी आपल्या पत्रात विचारला आहे.

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीमधून राऊत यांनी त्यांच्या आईला पत्र लिहिलं आहे. 

मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. ‘ईडी’,’इन्कम टॅक्स’ वगैरेच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले. मली बेइमानांच्या यादीत जायचे नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस. सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर बनावट व खोटो आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी ‘गन पॉइंट’वर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत,” असा आरोप राऊत यांनी केला आहे.

तसेच, “अप्र्त्यक्षपणे ठाकऱ्यांची साथ सोडा असे सुचवले जात आहे. याच प्रकारचा जुलूम टिळक, सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले, प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?” असा प्रश्न राऊत यांनी पत्रात विचारला आहे.

🤙 9921334545