कागल (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून त्या लवकरच पूर्ण करू असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिली.

कोल्हापूर येथे कामगार आयुक्त कार्यालयावर लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेमार्फत सोमवारी (ता.१०)विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला होता.
समरजित घाटगे यांनी या मोर्चाच्या शिष्टमंडळास मुंबई येथे प्रत्यक्ष कामगार मंत्री याची भेट घेऊन या मागण्यासंदर्भात चर्चा करू असा शब्द दिला होता.या पार्श्वभूमीवर घाटगे यांनी ना.खाडे यांची भेट घेतली व त्यांच्या सर्व मागणीवर सविस्तर चर्चा केली.
बांधकाम कामगारांच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने दिवाळीसाठी,कर्मचाऱ्यांना वीस,हजार.रुपये बोनस मिळवा, वय वर्ष 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास आर्थिक मदत मिळावी, गंभीररित्या आजार झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी चार दिवसाच्या आत आर्थिक सहाय्य मिळावे. कामगारांच्या मुलांना मिळणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती वाढवून मिळावी,मेडीक्लेम योजना सुरु करावी. या व इतर मागण्या या निवेदनात समाविष्ट केल्या आहेत.