गोकुळच्‍या झिम्‍मा-फुगडी स्‍पर्धेचा निकाल जाहीर ! 

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हादुध उत्पादक संघ अर्थात गोकुळ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेत गणेश दूध संस्था कपिलेश्वर (ता.राधानगरी)या संस्‍थेने  प्रथम क्रमांक मिळवला. बक्षीस वितरण समारंभ  संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात सौ.शांतादेवी डी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थित व चेअरमन विश्‍वास पाटील तसेच इतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाला.

कुळनेझिम्‍मा,फुगडी, चुईफुई, घागर घुमवणे, अशा पारंपारिक खेळांच्‍या स्‍पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेसाठी जिल्‍ह्यातून हजारो महिला उपस्थित होत्‍या.

यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, गोकुळने महिला सबलीकरणाचे काम अत्‍यंत चांगल्‍या प्रकारे केले असल्‍याने त्‍यांच्‍या कलागुणांना वाव देणे हे आपले कर्तव्‍य समजून गोकुळमार्फत अशा स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्‍पर्धेनंतर विजेत्‍यांना याच ठिकाणी बक्षीस वितरण करण्‍यात आले. विजेत्‍यांना जवळपास १ लाख २५ हजार रूपये रोख रक्‍कमेसह प्रशस्‍तीपत्रे व स्‍मृतिचिन्‍हे देण्‍यात आली. तसेच चुईफुई स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक निवाचीवाडी येथील समिक्षा सूर्यवंशी, गौरी सूर्यवंशी यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले. 

स्‍पर्धेचा निकाल व बक्षीस रक्‍कम खालीलप्रमाणे

झिम्‍मा स्‍पर्धा निकाल
क्रमांकबक्षीस रक्‍कमविजेते
पहिला१५,०००/-गणेश दूध संस्था कपिलेश्वर ता. राधानगरी
दुसरा१४,०००/-शाहू छत्रपती दूध संस्था शिरोली दु.ता.करवीर
तिसरा१३,०००/-सुवर्णा दूध संस्था माजनाळ ता.पन्हाळा
चौथा१२,०००/-शा.गो.पाटील दूध संस्था पंडेवाडी ता.राधानगरी
पाचवा११,०००/-हनुमान दूध संस्था घोटवडे ता.राधानगरी
उत्‍तजनार्थ -११०,०००/-महालक्ष्मी दूध संस्था व्हनूर ता.कागल
उत्‍तजनार्थ – २१०,०००/-श्री.कृष्ण दूध संस्था बहिरेश्वर ता.करवीर
फुगडी स्‍पर्धा निकाल
क्रमांकबक्षीस रक्‍कमविजेते
पहिला३,०००/-सौ.लता खापणे(कोतोली पैकी माळवाडी )सौ.अर्चना गायकवाड (कोतोली पैकी माळवाडी )
दुसरा२,८००/-सौ.दिपाली दिंडे (बहिरेश्वर)सौ.संगीता दिंडे (बहिरेश्वर)
तिसरा२,६००/-सौ.शितल शिपेकर (शिपेकरवाडी)सौ.शोभा बाटे (शिपेकरवाडी)
चौथा२,५००/-सौ.भारती कुंभार (शिरोली दु)सौ.सरिता पाटील (शिरोली दु.)
पाचवा२,४००/-सौ.गायत्री पाटील (जठारवाडी)सौ.पूजा चव्हाण (जठारवाडी)
चुईफुई  स्‍पर्धा
क्रमांकबक्षीस रक्‍कमविजेते
पहिला१,५००/-सौ.कविता खोत (घुंगुरवाडी)
दुसरा१,४००/-सौ.रेखा पाटील (कपिलेश्वर)
तिसरा१,३००/-सौ.शारदा बाटे (तेरसवाडी)
चौथा१,२००/-सौ.रोहणी रायकर (तेरसवाडी)
पाचवा१,१००/-सौ.अलका सूर्यवंशी (निवाचीवाडी)
घागर घुमविणे स्‍पर्धा
क्रमांकबक्षीस रक्‍कमविजेते
पहिला१,५००/-सौ.मंगल संभाजी करळे (देसाईवाडी)
दुसरा१,४००/-सौ.आरती कोळे (चंद्रे)
तिसरा१,३००/-सौ.विद्या पवार (माजनाळ )सौ.अल्का पाटील (पंडेवाडी|)
चौथा१,२००/-सौ.अनिता बाटे (शिपेकरवाडी)
पाचवा१,१००/-सौ.स्वाती  पाटील (कंदलगाव)

🤙 9921334545