भारत जोडो यात्रेअंतर्गत कोल्हापुरात काँग्रेसचा उद्या मेळावा

कोल्हापूर : भारत जोडो यात्रेअंतर्गत कोल्हापुरात आठ ऑक्टोबरला काँग्रेसच्यावतीने भव्य मेळावा आयोजित केला आहे. ऐतिहासिक दसरा चौकात हा मेळावा होत असून देशासह राज्य आणि जिल्ह्यातील दिग्गज नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील 1239 गावे, कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर, तसेच जिल्ह्यातील सर्व 13 नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र तसेच जिल्ह्याच्या गावागावात 13 एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा दाखविण्याचा भारतातील पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी सांगितले.

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेची सुरुवात केली आहे. या भारत जोडो यात्रेला विविध राज्यात ठिकठिकाणी पाठिंबा मिळत आहे. या यात्रेला पाठींबा दर्शवण्यासाठी, कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्यावतीने 8 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. ऐतिहासिक दसरा चौकात हा मेळावा होत असल्याने या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. राजर्षी शाहू समाधी स्थळाला अभिवादन करून या मेळाव्याला सुरुवात करण्यात येणार आहे.

या मेळाव्यासाठी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर मेळाव्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे दहा हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आ. पी. एन. पाटील, आ. श्रीमती जयश्री जाधव, आ. जयंत आसगांवकर, आ. ऋतुराज पाटील, आ. राजूबाबा आवळे
गुलाबराव घोरपडे, प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत पाटील बुध्दीहाळकर, प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, सेवादल जिल्हाध्यक्ष रंगराव देवणे, संजय पोवार-वाईकर, उदय पोवार, वैभव तहसीलदार, अक्षय शेळके, पार्थ मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व माजी आमदार, सर्व तालुकाध्यक्ष तसेच सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत

🤙 9921334545