चुये : गोकुळचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पत्नी व विद्यमान संचालक शशिकांत पाटील यांच्या मातोश्री, गोकुळच्या माजी संचालिका श्रीमती जयश्री आनंदराव पाटील-चुयेकर (वय ७८) यांचे निधन झाले.
गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. आज गुरूवार सकाळी ११ च्या सुमारास चुये येथे त्यांचे निधन झाले. गोकूळच्या उभारणीत आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या खांद्याला खांदा देवून संघ स्थापनेपासून त्यांनी कष्ट घेतले होते. गोकुळ हेच माझे कुंटूब आहे असे मानून त्यांनी सर्व त्याग पत्करून उभे आयुष्य खर्ची घातले. कै. आनंदराव पाटील यांच्या मुत्युनंतर त्यांनी केवळ एकदाच गोकूळच्या संचालिका म्हणून काम पाहिले होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सहा मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.